रत्नागिरी : देवरुख करंबेळे येथील सहाणेजवळ रिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकासह त्याची पत्नी आणि आई जखमी झाले. ही घटना गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. घडली. साईप्रसाद महादेव लिंगायत (वय ३५) हा त्याच्या ताब्यातील रिक्षातून त्याची पत्नी सई साईप्रसाद लिंगायत (३०) आणि त्याची आई रेश्मा महादेव लिंगायत (५५, सर्व रा. शिवणे, संगमेश्वर) यांना घेऊन जात होता.
तो देवरुख करंबेळे येथील सहाणेजवळ आला असता त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्यामुळे रिक्षाचा अपघात होउन तिघेही किरकोळ जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीने प्रथम देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 16/Jan/2026














