सावर्डे : छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने उपचारासाठी नेत असताना ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. सुरेश विष्णू जोंधळे (वय ५५, मूळ रा. चिखली, ता. संगमेश्वर, सध्या रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार १२ जानेवारी रोजी दुपारी २.२९ वाजण्याच्या सुमारास सुरेश जोंधळे यांना छातीत तीव्र दुखू लागल्याने त्यांना डेरवण येथील दवाखान्यात नेण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर रमेश भालचंद्र शिंदे यांनी त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालये येथे दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ते यापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद सावडें पोलिस ठाण्यात करण्यात आली असून त्याची नोंद १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७.४४ वाजता करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 16/Jan/2026














