गुहागर : गुहागर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे संतोष सांगळे, तर शिवसेनेचे अमरदीप परचुरे यांची निवड करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीमध्ये या निवडणुकीत भाजप व शिवसेना युती झाली होती. यात भाजपला नगराध्यक्षपद, तर शिवसेनेला उपनगराध्यक्षपद सोडण्यात आले. जनतेतून भाजपच्या नीता मालप, तर युतीचे १७ पैकी १३ नगरसेवक निवडून आले होते. गुरुवारी उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल व स्वीकृतसाठी अमरदीप परचुरे यांची नावे निवड केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या आदेशानुसार स्वीकृत नगरसेवकपदी संतोष सांगळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा नीता मालप, भाजपा जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, भाजपचे गटनेते उमेश भोसले, शार्दुल भावे, शिवसेना शहर प्रमुख नीलेश मोरे, राकेश साखरकर, शिवसेनेचे गटनेते अमोल गोयथळे यांच्यासह सेना-भाजप युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
शहराला अभिमान वाटेल असे काम करू : प्रदीप बेंडल
भाजप-सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली संधी व शहरवासियांनी दिलेली साथ यामुळे पुढील पाच वर्षांत गुहागरला अभिमान वाटेल असेच काम सर्व नगरसेवकांच्या साथीने करू. तसेच गुहागरातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच गुहागर शहरातील मूलभूत रस्ते, पाणी, आरोग्य अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार असल्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 16/Jan/2026














