Ratnagiri : दहापेक्षा अधिक मोटार अथवा वाहने वापरण्यास ताफ्यामध्ये बंदी; ७ फेब्रुवारी पर्यंत निर्बंध

रत्नागिरी : कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. ७फेब्रुवारी २०२६ पर्यंत) निर्बंध घालीत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, २०२३ चे कलम १६३ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ७ फेब्रुवारी पर्यंत निर्बंध घातले आहेत. पोलिसांनी तसे ध्वनिक्षेपकावर जाहीर करून त्यास प्रसिद्धी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 16/Jan/2026