Ratnagiri : निवडणूक साहित्य सार्वजनिक ठिकाणी लावण्यास निर्बंध

रत्नागिरी : निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक घातल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी निर्बंध मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस्, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे जिल्हादंडाधिकारी श्री. जिंदल यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (डीबी) अन्वये अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घातले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 16/Jan/2026