गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर बौद्धवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी अजय अशोक जाधव वय ३५ वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजल्यापासून ते दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या दरम्यान घडली आहे. अजय जाधव याने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी बीमला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेची खबर मयताचे चुलते चंद्रमणी गणपत जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या माहितीनुसार, अजय जाधव हा घराच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला. गुहागर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू क्रमांक ०२/२०२६ आणि बी.एन.एस.एस. (BNSS) १९४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या तरुणाने आत्महत्या का केली याचं नेमक कारण कळू शकलं नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 16/Jan/2026














