Ratnagiri : निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म, भाषावार शिबिर आयोजनास निर्बंध

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिर, मेळाव्यांचे आयोजनावर जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निर्बंध घातले आहेत.

जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबीरांचे मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निर्बंध घातले आहेत. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनिक्षेपकावर पोलिस विभागाने जाहीर करून प्रसिद्धी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 16/Jan/2026