श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे तालुकास्तरीय पठण स्पर्धा उत्साहात

जाकादेवी : जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र व प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय पठण स्पर्धा गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव भक्त निवासात उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान चे सरपंच नीलेश कोल्हटकर यांनी केले. यावेळी खजिनदार अमित मेहेंदळे, सचिव विद्याधर शेंडे, पंच विनायक राऊत, श्रीराम केळकर, श्रीहरी रानडे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या पठण स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गट क्रमांक एक: पहिली ते तिसरी: श्री गणपती स्तोत्र संस्कृतमध्ये प्रथम क्रमांक ऋग्वेद रितेश रेवाळे (कृ. वी. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी), द्वितीय क्रमांक देविका दिनेश चव्हाण (जि. प. प्राथमिक शाळा गणपतीपुळे), तृतीय क्रमांक स्वरा अनिल रामाणी (जि. प. प्राथमिक शाळा भंडारपुळे).

गट दोन : तिसरी ते चौथी : या गटासाठी विषय होता मनाचे श्लोक (६१ ते ८०) यामध्ये प्रथम क्रमांक भक्ती नीलेश अभ्यंकर (जि. प. प्राथमिक शाळा मालगुंड तळेपाट नंबर २), द्वितीय क्रमांक सौमी सुशील भुते (जि. प. प्राथमिक शाळा भगवतीनगर), तृतीय क्रमांक ईशान प्रणव काणे (जि. प. प्राथमिक शाळा निवेंडी).

गट तीन: पाचवी ते सहावी : या गटा साठी विषय होता मनाचे श्लोक (१८१ ते २००) यामध्ये प्रथम क्रमांक वल्लरी विश्वनाथ मुकादम (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक स्वरा मकरंद काणे (बळीराम परकर विद्यालय मालगुंड), तृतीय क्रमांक वैष्णवी शैलेश घाणेकर (जि. प प्राथमिक शाळा भगवतीनगर).

गट क्रमांक चार : सातवी ते आठवी या गटा साठी विषय होता रामरक्षा यामध्ये प्रथम क्रमांक धैर्या नरेंद्र गावणकर (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक अनय वैभव कानडे (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), तृतीय क्रमांक आर्या अतुल रानडे (बळीराम परकर विद्यालय मालगुंड).

गट पाच : नववी ते दहावी : या गटा साठी विषय होता शिव महिन्म स्तोत्र यामध्ये प्रथम क्रमांक निधी चारूल मोडक (फाटक हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक श्रीराज राजेश ओक (बळीराम परकर विद्यालय मालगुंड), तृतीय क्रमांक श्रीयश श्रीहरी रानडे (बळीराम परकर विद्यालय मालगुंड).

गट क्रमांक सहा: अकरावी ते बारावी : या गटा साठी विषय होता श्रीमद्भगवदगीता १६ वा अध्याय. यामध्ये प्रथम क्रमांक प्रांजली सतीश बोले (जयगड ज्युनिअर कॉलेज), द्वितीय क्रमांक श्रुती सिद्धार्थ चव्हाण (जयगड ज्युनिअर कॉलेज), तृतीय क्रमांक स्वानंदी पंकज भोसले (जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालय).

विजेत्या पहिल्या तीन गटातील सर्व स्पर्धकांना त्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रत्येकी रुपये १२५१, १००१, ७५१, तर उर्वरीत तीन गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १७५१, १५५१, १२५१ रुपये तसेच सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू दिल्या. परीक्षक म्हणून श्री. पाटवकर, वासुदेव केळकर, श्रीकांत मेहेंदळे, मिलिंद सुर्वे, बाबासो बेडक्याळे, सुशांत लाकडे यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 16/Jan/2026