Harshvardhan Sapkal on Municipal Corporation Election Result: महाराष्ट्रात काँग्रेसला 300 पेक्षा जास्त जागा मिळणार, 5 महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येणार – हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal on Municipal Corporation Election Result : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या कालासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस 300 पेक्षा जास्त जागा जिंकू शकेल असे मत सपकाळ यांनी व्यक्त केलं आहे. तर 5 पेक्षा अधिक महापालिकेवर काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत सत्ताधाऱ्यांनी पैसा आणि जातीयवाद पेरला

मुंबईत सत्ताधाऱ्यांनी पैसा आणि जातीयवाद पेरला होता असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. त्याला मुंबईकर भुरळणार नाहीत अशी अपेक्षा आहे.थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. नगर पालिकेचाच कित्ता महानगरपालिकेत गिरवला गेला आहे.पैशाचा महापूर या निवडणुकीच्या अनुषगांने पुढे आला आहे. सत्ताधाऱ्यांनी तमाशा मांडल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आम्ही वैचारिक भूमिका घेऊन लढलो आणि लढत राहू असेही ते म्हणाले. हार जित हा मुद्दा सध्याच्या काळात गैर आहे. वैचारिक संघर्षाची भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे असे सपकाळ म्हणाले.

पैशाची उधळपट्टी ही लोकशाहीला मारक

निवडणुकीत पैशांचा वापर आणि बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, पाकिटेच पाकिट पुऱ्या महाराष्ट्राला बघायला मिळाली आहेत. मुळात 50 खोके एकदम ओके हा नारा पुढे आल्या पासून जनतेसमोर चुकीचा संदेश सत्ताधाऱ्यांचा पुढे आला. तेव्हापासून पुढे 70 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचे आरोप करुन अजितदादांना सत्तेत घेतल्या गेलं. मतदारामध्ये लोकशाहीच्या मूल्यांची फार मोठ प्रमाणात अवलोकन झालेल आहे. तेव्हापासून पैशाची उधळपट्टी ही लोकशाहीला मारक झाली आहे. त्यामुळे आपण लोकशाहीच्या संक्रमन अवस्थेतून पुढे जात आहोत. संविधान स्वरूपात परिवर्तन झाले पाहिजे अन्यथा आराजक्ता ही दूर नाही असे सपकाळ म्हणाले.

राज्यातल्या 29 महापालिकांसाठी काल मतदान झाल्यावर आज सर्वत्र मतमोजणी सुरु झाली आहे. काही ठिकाणचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के, ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालं आहे. सध्या महाती आलेल्या कलानुसार अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांची युती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 16-01-2026