मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोमसापतर्फे मालगुंडमध्ये १८ जानेवारी रोजी विविध स्पर्धा

गणपतीपुळे : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त कोमसाप मालगुंड शाखेतर्फे १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मालगुंड कवी केशवसुत स्मारकात विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. -निबंध स्पर्धेसाठी गट १ इयत्ता पहिली ते चौथीसाठी माझी आई, माझी शाळा, गट २ इयत्ता पाचवी ते आठवीसाठी माझी माय मराठी, माझा आवडता साहित्यिक, गट ३ इयत्ता आठवी ते बारावीसाठी अभिजात मराठी भाषेचे महत्त्व, मालगुंड कवितेची राजधानी, गट ४ – खुलासाठी मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण, पुस्तकांचे गाव महत्त्व व गरज, वक्तृत्व स्पर्धेसाठी गट १ शालेय गटासाठी माझी शाळा आणि मराठी, -सक्तीची मराठी भाषा व शाळांमधील वास्तव, वाचाल तर वाचाल, गट २-खुलासाठी अभिजात मराठी भाषा : गरज व महत्त्व, पुस्तक माझे मार्गदर्शक, आधुनिक मराठीचे जनक कवी केशवसुत विषय ठेवले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 16/Jan/2026