रत्नागिरी नाट्य परिषदेच्या कामाचे प्रशांत दामलेंकडून कौतुक

रत्नागिरी : अखिल भारतीय मरा‌ठी नाट्य परिषदेची रत्नागिरी शाखा उत्तम काम करत आहे. तसेच शाखेचे आगामी उपक्रम हे नक्कीच उत्तम आणि प्रेरणादायी आहेत शिवाय इथल्या मातोशी जुळलेले आहेत, असे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले.

येथील स्वा. सावरकर नाट्यगृहातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखा कार्यालयाला प्रशांत दामले यांनी भेट दिली. या कार्यालयास आणि दोन्ही कार्यकारिणी सदस्यांना भेटून खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी अखिल भारतीय मराठी नाटप परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समोर इंदुलकर, श्रीकांत भाटवडेकर, वामन कदम, सतीश दळी, अमेय घोपटकर, श्रीकांत पाटील, सुधाकर बेहेरे, आप्पा रणभिसे आदी उपस्थित होते, अभिनेते प्रशांत दामले यांचा दोन्ही कार्यकारिणीतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. समर्थ कृपा प्रॉडक्शन निर्मित लोककलावंत सुनील बेडखळे यांच्या आगामी संगमेश्वरी बोलीतील “कोन नाय कोणचा” या गणेश राऊत दिग्दर्शित नाटकाच्या पोस्टरचे अनावरण श्री. दामले यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 28/Oct/2024