BMC Result 2026 Winners List: मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा डंका!

राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारली. तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते.

पण त्यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. मुंबईत भाजप-शिंदेसेना विरूद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत होती. ठाकरे बंधूंनी मराठी माणूस हा मुद्दा प्रचारात वापरला, तर भाजप-शिंदेसेनेने विकास या मुद्द्यावर प्रचार सुरु ठेवला. या प्रचारात भाजप-शिंदेसेनेच्या विकासाने बाजी मारली. दुपारी १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप ९२ जागांवर, शिंदेसेना २६ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे उद्धवसेना ६० तर राज ठाकरेंची मनसे केवळ ९ जागांवर आघाडीवर आहे.

मुंबईतील मराठी पट्ट्यात ठाकरे बंधूंना आपली ताकद दाखवण्याची संधी होती. पण त्यांना त्यापद्धतीची कमाल करता आली नाही. जाणून घ्या, मुंबईतून कोणत्या वॉर्डातून कोण विजयी झाले, पाहूया.

मुंबईतील सर्व 227 वॉर्डमधील विजयी उमेदवारांची यादी

  1. प्रभाग क्रमांक 1 – रेखा यादव – शिवसेना
  2. प्रभाग क्रमांक 2 – तेजस्वी घोसाळकर – शिवसेना
  3. प्रभाग क्रमांक 3 – प्रकाश दरेकर – भाजप
  4. प्रभाग क्रमांक 4 – मंगेश पंगारे – शिवसेना
  5. प्रभाग क्रमांक 9 – शिवानंद शेट्टी – भाजप
  6. प्रभाग क्रमांक 19 – प्रकाश तावडे – भाजप
  7. प्रभाग क्रमांक 20 – दीपक तावडे – भाजप
  8. प्रभाग क्रमांक 32 – गीता भंडारी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  9. प्रभाग क्रमांक 33 – मोईन सिद्दिकी – काँग्रेस
  10. प्रभाग क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा – भाजप
  11. प्रभाग क्रमांक 37 – योगिता कदम – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  12. प्रभाग क्रमांक 50 – विक्रम राजपूत – भाजप
  13. प्रभाग क्रमांक 52 – प्रीती साटम – भाजप
  14. प्रभाग क्रमांक 72 – ममता यादव – भाजप
  15. प्रभाग क्रमांक 73 – लोना रावत – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  16. प्रभाग क्रमांक 87 – पूजा महाडेश्वर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  17. प्रभाग क्रमांक 103 – हेतल गाला – भाजप
  18. प्रभाग क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे – भाजप
  19. प्रभाग क्रमांक 194 – निशिकांत शिंदे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  20. प्रभाग क्रमांक 123 – सुनील मोरे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  21. प्रभाग क्रमांक 124 – सकिना शेख – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  22. प्रभाग क्रमांक 134 – मेहजबीन खान – एमआयएम
  23. प्रभाग क्रमांक 135 – नवनाथ बन – भाजप
  24. प्रभाग क्रमांक 137 – समीर पटेल – एमआयएम
  25. प्रभाग क्रमांक 145 – खैरुनिसा हुसेन – एमआयएम
  26. प्रभाग क्रमांक 147 – प्रज्ञा सदाफुले – शिवसेना
  27. प्रभाग क्रमांक 156 – अश्विनी माटेकर – शिवसेना
  28. प्रभाग क्रमांक 157 – सरिता म्हसके – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  29. प्रभाग क्रमांक 165 – अशरफ आझमी – काँग्रेस
  30. प्रभाग क्रमांक 172 – राजश्री शिरवाडकर – भाजप
  31. प्रभाग क्रमांक 182 – मिलिंद वैद्य – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  32. प्रभाग क्रमांक 184 – आशा काळे – काँग्रेस
  33. प्रभाग क्रमांक 185 – जगदीश थेवलपील – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  34. प्रभाग क्रमांक 200 – उर्मिला पांचाळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  35. प्रभाग क्रमांक 201 – इरम सिद्दिकी – समाजवादी पार्टी
  36. प्रभाग क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे – भाजप
  37. प्रभाग क्रमांक 210 – सोनम जमसुतकर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  38. प्रभाग क्रमांक 214 – अजय पाटील – भाजप
  39. प्रभाग क्रमांक 215 – संतोष ढाले – भाजप

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 16-01-2026