देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील बोरसुत येथे जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा बिबट्या जखमी असल्याने जास्त हालचाल करत नव्हता. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या जखमी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून त्याच्या हालचाली मर्यादित होत्या. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला पकडून पुढील उपचारासाठी हलवले आहे. सध्या बिबट्या जखमी असण्याचे कारण स्पष्ट झाले नसून वैद्यकीय तपासणीनंतर अधिक माहिती समोर येणार आहे. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी आढळून आल्यास घाबरून न जाता तात्काळ वनविभागाला कळवावे व स्वतःहून जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 16/Jan/2026














