Dapoli : जिल्हा परिषद शाळेच्या सहा विद्यार्थिनींची नासा-इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून सहा विद्यार्थिनींची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने तालुक्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. केंद्र ते जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या विविध चाळणी परीक्षा आणि प्रयोगात्मक प्रात्यक्षिकांमधून या विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

चंद्रनगर शाळेतील आरोही मुलूख आणि निरजा वेदक यांची नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून, निरजा वेदक हिच्यासह दिक्षा येसवारे (किन्हळ), अक्षरा पाटील (विरसई), प्रांजल खळे (नवशी) आणि सृष्टी कोठावळे (हर्णे नं. १) या चार विद्यार्थिनी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवडल्या गेल्या आहेत. लवकरच या सर्व विद्यार्थिनी प्रत्यक्ष विमान प्रवास करत विज्ञानाच्या विश्वात गगनभरारी घेणार आहेत.

जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इस्रो-नासा अभ्यास दौऱ्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम स्वप्नपूर्ती ठरत आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी कधी विमान जवळून पाहिले नसेल, पण त्यांची ही मुले प्रत्यक्ष विमानाने आकाशाला गवसणी घालणार आहेत.

जालगाव येथील अजिंक्य तलाठी यांच्या स्मरणार्थ सुधीर तलाठी यांनी जिल्हास्तरीय निवड चाचणीत पात्र ठरलेल्या दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा जालगाव नं. १ येथे दोन दिवसांची प्रयोग कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा लाभ दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून सहा विद्यार्थिनींची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने तालुक्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. केंद्र ते जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या विविध चाळणी परीक्षा आणि प्रयोगात्मक प्रात्यक्षिकांमधून या विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

चंद्रनगर शाळेतील आरोही मुलूख आणि निरजा वेदक यांची नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून, निरजा वेदक हिच्यासह दिक्षा येसवारे (किन्हळ), अक्षरा पाटील (विरसई), प्रांजल खळे (नवशी) आणि सृष्टी कोठावळे (हर्णे नं. १) या चार विद्यार्थिनी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवडल्या गेल्या आहेत. लवकरच या सर्व विद्यार्थिनी प्रत्यक्ष विमान प्रवास करत विज्ञानाच्या विश्वात गगनभरारी घेणार आहेत.

जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इस्रो-नासा अभ्यास दौऱ्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम स्वप्नपूर्ती ठरत आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी कधी विमान जवळून पाहिले नसेल, पण त्यांची ही मुले प्रत्यक्ष विमानाने आकाशाला गवसणी घालणार आहेत.

जालगाव येथील अजिंक्य तलाठी यांच्या स्मरणार्थ सुधीर तलाठी यांनी जिल्हास्तरीय निवड चाचणीत पात्र ठरलेल्या दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा जालगाव नं. १ येथे दोन दिवसांची प्रयोग कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 16/Jan/2026