Election : गुहागर प्रशासन आगामी निवडणुकांसाठी सज्ज

आबलोली : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील प्रशासन या निवडणुकांसाठी सज्ज झालेल आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यामध्ये १४५ केंद्र असून त्या केंद्रांवरती ४४,११५ पुरुष, तर ५५,६१७ महिला असे एकूण ९६,८३२ मतदार असणार आहेत.

गुहागर तालुक्यात ५ जिल्हा परिषद गट, तर १० पंचायत समिती गण आहेत. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकूण २० पथकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यात २३२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २ भरारी पथकांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती गुहागर तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी गुहागर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 16/Jan/2026