Nitesh Rane: ठाकरे बंधूंनी आता पाकिस्तानात जावं; नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालाचे अंतिम कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरल्याचे दिसून आलं आहे. अशातच देशभऱ चर्चेत राहिलेल्या मुंबईत महानगरपालिकेत टाकरे बंधूना धक्का देत भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे.

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीचा महापौर होणार हे जवळपस निश्चित झालं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळचे इस्लामाबादचे विमान पकडावे आणि पाकिस्तानमध्ये जावं, अल्लाहो अकबर म्हणत राहायचं असा खोचक टोला नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना लगावला.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

माझा हसणारा चेहरा उद्धव ठाकरेला पाठवा, त्या सगळ्यांना माझा जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात जय श्रीराम वाला महापौर बसण्याची तयारी झाली आहे. मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार असे नितेश राणे म्हणाले. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळची इस्लामाबादची विमान पकडावी आणि पाकिस्तानमध्ये जावं. अल्लाहो अकबर म्हणत राहावं असा खोचक टोला देखील नितेश राणे यांनी लगावला आहे.

मुंबईतील 227 जागांपैकी 127 जागांवार भाजप आणि शिवसेनेची आघाडी

मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल (BMC Election Result 2026) जाहीर होत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी जवळपास 52.94 टक्के मतदान झालं. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसेने युती केली. ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र्य मैदानात उतरली. तर काँग्रेस आणि वंचितने एकत्र निवडणूक लढवली होती. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील 227 जागांपैकी 127 जागांवार भाजप आणि शिवसेनेची आघाडी दिसून येत आहे. भाजपाची जवळपास 96 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. अशातच महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुची युती झाली होती, त्यांनी मुंबईतील मराठी मतदारांना भावनिक साद घातली होती, मात्र निकालामध्ये त्याचं कोणतंही प्रतिबिंब दिसून आलं नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 16-01-2026