गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी गुहागरमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता येथील सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी धावपळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. गुहागरात 5 जिल्हा परिषद गटासाठी व 10 पंचायत समिती गणासाठी निवडणूक पार पडणार असून एकूण 15 जागांसाठी याठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार पासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 17-01-2026














