रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने मतदान केंद्रांवर आवश्यक ती सर्व सुविधा देण्याबाबत तसेच दुरुस्तीविषयक कामकाजाबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरुन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांच्या पथकांना विधानसभा मतदार संघात आढावा घेण्यासाठी पाठवले होते. त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
मतदान करेपर्यंत मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. त्याबाबत टोकनही द्यावेत. एमआयडीसीमध्ये देखील तहसिलदारांनी तपासणी करावी. एफएसटी आणि एसएसटीमध्ये मनुष्यबळ वाढवले जाईल. उत्पादन शुल्क, एफएसटी, एसएसटी यांनी संशयित वाहनांची तपासणी करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृतीबाबत नियोजन काय केले आहे, त्याची माहिती द्यावी. तसेच प्रभावीपणे अंमलबजावणीही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी 400 गृहरक्षक दल मागवून घेण्यात येईल. त्यांचा विविध पथकांमध्ये तपासणीसाठी समावेश केला जाईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनीही यावेळी सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 28-10-2024