Election 2026 | राजापुरात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

राजापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी राजापूर तालुक्यातून एकही अर्ज सादर झाला नाही. मात्र येथील निवडणूक कार्यालयातून पंचायत समिती गणासाठी दहा आणिजिल्हा परिषद गटासाठी तीन असे तेरा अर्ज वितरित झाले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. राजापूर तालुक्यात सहा जिप गट आणि त्या अंतर्गत बारा पंचायत समिती गण यामध्ये निवडणूक होणार आहे. १६ पासून उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र पहिल्या दिवशीपंचायत समिती गणासाठी दहा तर जिप गटासाठी तीन अर्ज वितरित झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 17/Jan/2026