Ratnagiri : बेदरकारपणे दुचाकी चालवून एसटी बसला धडक; स्वार गंभीर जखमी

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या एसटीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास गावखडी कासार पऱ्या याठिकाणी घडली असून यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. सुशांत शामराव फोडकर (२५, रा. कशेळी भंडारवाडी, राजापूर) असे अपघातातील जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्या विरोधात महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रद्धा करळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी सुशांत फोडकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८-बीजे-८३९७) ही घेऊन भरधाव वेगाने गोळप ते कशेळी अशा जात होता. तो गावखडी कासार पऱ्या य ठिकाणी आला असता त्याने समोरून येणारी एसटी (एमएच-२०-बीएल-३३१२) हिला मागील उजव्या चाकाजवळ ठोकर देऊन अपघात केला. यात सुशांतला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 17/Jan/2026