ठाणे : राज्यातील ८७ मतदारसंघ संवेदनशील असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले असून मुंबईतील ६, कोकणातील १०, पश्चिम महाराष्ट्रातील १८, उत्तर महाराष्ट्रातील १४, विदर्भातील १७, तर मराठवाड्यातील १५ मतदारसंघ संवेदनशील जाहीर करण्यात आले आहेत.
येथे सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. कोकणात सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, कणकवली, पालघर, डहाणू, वसई, ठाण्यात भिवंडी पूर्व, मुरबाड, उल्हासनगर, डोंबिवली, ओवळा माजीवडा, ऐरोली, बेलापूर, ठाणे शहर.
मुंबईत वांद्रा, पूर्व कुर्ला, भांडूप पश्चिम, माहीम, मुंबादेवी, कुलाबा
रायगडमध्ये पनवेल, कर्जत, उरण हे मतदारसंघ संवेदनशील आहेत.
महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सोलापूर शहर, उत्तर माळशिरस, पुण्यामध्ये खेड, आळंदी, शिरूर, दौंड, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी वडगाव, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती मध्य. हडपसर आणि पुणे कॅन्टोमेंट.
कोल्हापूरमध्ये चंदगड, कोल्हापूर उत्तर, शिरोळ आणि सांगलीमध्ये सांगली शहर हे मतदारसंघ संवेदनशील आहेत.
नाशिक विभागात बागलान, कळवण, दिंडोरी, नाशिक मध्य, इगतपुरी.
धुळ्यामध्ये साकी, धुळे शहर, शिरपूर, जळगावमध्ये चोपडा, जळगाव शहर, रावेर.
नंदूरबारमध्ये अक्कलबुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर.
बुलढाण्यात मलकापूर, चिखली, बुलढाणा वर्ध्यामध्ये वर्धा
नागपूरमध्ये हिंगणा, नागपूर पूर्व, नागपूर
भंडाऱ्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बल्लापूर.
यवतमाळमध्ये आणि नांदेडमध्ये किनवट, भोकर आणि डेगलूर परभणीत जिंतूर, परभणी, जालना
छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलंब्री, संभाजीनगर मध्य आणि गंगापूर,
लातूरमध्ये नीलंगा, अवसा, धाराशिव, उमरगा.
अहिल्यानगरमध्ये संगमनेरनगर शहर असेमतदारसंघ संवेदनशील मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदारसंघ हे प्रमुख नेत्यांची आहेत. उमेदवारी असलेले संवेदनशील मतदार संघावरती निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवणार आहेत. कोकणात संवेदनशील मतदारसंघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी, नितेश राणेंचा कणकवली, ठाण्यात मुस्लीमबहुल असलेला भिवंडी पूर्व असे मतदार संघ आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 28/Oct/2024














