चिपळूण नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक २० जानेवारी रोजी

चिपळूण : येथील चिपळूण नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. होणार आहे. यादिवशी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षांना पदसिद्ध कोणत्या समितीचे सदस्यत्व देण्यात येणार याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गिय समिती सभापतीपदांची निवड प्रक्रिया होणार आहे. नगर परिषदेत शिवसेना-भाजपा महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या सर्व विषय समितींचे नेतृत्व महायुतीकडे राहाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 17/Jan/2026