चिपळूण : पाली फाटा-निरबाडे फाट्या पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहन चालविणे जिकिरीचे बनले आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवालण ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात येत आहे.
निरबाडे हा काडवली, धामणंद पंधरागावकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वाहनचालक वापर करतात. असे असताना पाली फाटा ते निरबाडे फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी खड्यात वाहने आदळून अपघात घडले आहेत. सद्यस्थितीत या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे चुकवताना कसरत होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 17/Jan/2026














