रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने नागरिक केंद्रित पोलीमिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरू केली आहेत. या उपक्रमांमध्ये पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. यातील एक उपक्रम म्हणजे ‘मिशन परिपूर्ती’ हा आहे.
बरेचदा नागरिक आपत्कालीन परिस्थितीत, मदतीसाठी किंवा समस्या निवारणासाठी किंवा पोलिसांची मदत मिळवण्यासाठी डायल ११२ या प्रणालीवर कॉल करतात किंवा जवळच्या पोलिस ठाण्याला कॉल केला जातो. ११२ प्रणाली अंतर्गत प्राप्त कॉल हे सेंट्रल सिस्टिमकडे मुख्यालयातील पोलिस नियंत्रण कक्ष येथे येतात. येथून हे कॉल संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठविले जातात व नंतर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी – अंमलदार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्याच्या समस्या सुटण्यासाठी आवश्यक ती मदत करतात.
मात्र, संबंधित नागरिकाला प्रत्यक्षात योग्य व आवश्यक पोलीस मदत मिळाली आहे की नाही, त्यांची समस्या पूर्णपणे सुटली आहे की नाही, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना थेट माहिती मिळणे शक्य होत नाही. हीच बाब रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी लक्षात घेऊन व रत्नागिरी पोलिस दलामार्फत डायल ११२ कॉलरच्या मदतीची खात्री अभिप्रायासाठी हा नावीन्यपूर्ण व विशेष लोकाभिमुख उपक्रम ‘मिशन परिपूर्ती’ २९ ऑगस्ट २०२५ पासून सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांची पूर्तता होण्यास मदत होत आहे.
नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच कॉल करणाऱ्या सर्व व्यक्तींचा अभिप्राय घेण्यासाठी ‘मिशन परिपूर्ती’ अंतर्गत एक विशेष सेल तयार करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या समस्या सुटल्या किंवा नाहीत, हे कळू शकते.
१०० टक्के निराकरण…
रजिस्टरमधील नोंदींचे अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी व स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे नियमित मॉनिटरिंग करतात. गरज भासल्यास ‘मिशन परिपूर्ती’ सेलमार्फत संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधला जातो व त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाते. आवश्यक मदत मिळाली का?, समस्या सुटली की नाही, वागणूक योग्य होती का, याबाबतही त्याचा अभिप्राय घेतला जातो. अशा समस्यांचे १०० टक्के निराकरण ‘मिशन परिपूर्ती’ सेलने केले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 17/Jan/2026














