Chiplun : मार्गताम्हाणे येथे उद्या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

अडरे : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील श्री देवी पद्मावती विद्या संकुल येथे १८ जानेवारी रोजी ८ वाजता सकाळी तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव भागवत माध्यमिक व कै. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय व सेमी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, पदक, प्रशस्तीपत्र, सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत चिपळूण, गुहागर तालुक्यांतील वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा सहभागी होतात. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, माध्यमिक व ज्युनियर कॉलेज प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांच्यासह सर्व शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी केले आहे. सहभागासाठी मॅरेथॉन कमिटीचे प्रा. डॉ. नामदेव डोंगरे, राकेश खांडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 17/Jan/2026