मंडणगड : महिलांनी आपले स्त्री पण जपत उत्तम आरोग्यानिशी कुटुंब व समाजाचे प्रगतीकरिता जागृत राहून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महिला आघाडीच्या अध्यक्षा अँड. समिधा सापटे यांनी मंडणगड येथे केले. शहरातील कुणबी भवन या सार्वजनीक वास्तुचे वर्धापन दिनाचे औचीत्य साधून मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महिला आघाडी, यांच्यावतीने 17 जानेवारी 2026 रोजी कुणबी भवन मंडणगड येथे तालुक्यातील महिलांकरिता हळदी कुंकू समारंभासह सत्कार कार्यक्रम, मनोगत, मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निमीत्ताने आयोजीत स्वागत समारंभाचा अध्यक्षीय समारोप करताना अँड. सापटे बोलत होत्या यावेळी त्या पुढे म्हणाल्या की बदलत्या काळात महिलांनी चूल मुल कुटुंब यांचे पलीकडे जाऊन जागृत राहून रोजगार व स्वयंरोजगार करत कुटुंब समाज व देशाचे प्रगतीत हातभार लावणे गरजेचे आहे त्याकरिता समाजाचे महिला आघाडीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी विस्ताराने माहीती दिली.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, डॉ. शरयु बैकर, नगरसेविका प्रमिला किंजळे, तालुक्यातील महिला सरपंच सौ. सानिका पाटील, सौ. दीपिका जाखल, सौ. अंजली घागरूम, सौ. सुशमा बांडल, सौ. भाविका बोबले, सौ. करिता रक्ते, या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्याय कार्यक्रमात डॉ. शरयू बैकर यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर तालुक्यातून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सौ. अस्मिता केंद्रे, सौ. अंजली बैकर, सौ. सुहासिनी काजारे, सौ. सानिका पाटील आदीनी मनोगत व्यक्त केली. सौ. अस्मिना पारधी सुस्वर प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. सुत्रसंचालन अँड. दीपांजली धाडवे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी महिला आघाडीच्या सौ. दिव्या साळवी, सौ. ईशा भुवड, सौ. रश्मी भुवड, सौ. वैशाली माळी, सौ. स्वरा कदम, सौ. शुभ्रा कदम, सौ. सरिता तांबिटकर, सौ. स्वाती करावडे, सौ. संपदा करावडे, सौ. मयुरी कोबनाक यांच्यासह उपाध्यक्ष सचिन माळी, सरचिटणीस विजय ऐनेकर, सल्लागर रघूनाथ पोस्टुरे यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 17/Jan/2026














