रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत (Uday Samant) यांनी आज रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी (ZP Election) शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत, ‘सोशल इंजिनिअरिंग’ (Social Engineering) आणि विकासाच्या जोरावर आपण ५६ पैकी ५६ जागा जिंकू, असा दावा केला.
उमेदवारांची पहिली यादी जाहीर : मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी खालील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे:
खेडशी जिल्हा परिषद: सौ. हर्षदा भिकाजी गावडे
मुचरी जिल्हा परिषद: माधवीताई गीते
कसबा: रचनाताई महाडिक
शिरगाव: सौ. श्रद्धा दीपक मोरे
पावस: महेंद्रजी मांडवकर
खालगाव: महेश माप
गोळप: नंदकुमार मुरकर
वेळणेश्वर: नेत्रा ठाकूर
पडवे: महेश नाटेकर
हातखंबा पंचायत समिती: विद्याविलास बोमले
देवड पंचायत समिती: नेहा गावणकर
नाणीज पंचायत समिती: डॉ. पद्मजा संजय कांबळे
सोशल इंजिनिअरिंगचा मास्टरस्ट्रोक
उमेदवारी देताना आपण कुणबी समाजासह, धनगर आणि इतर सर्व समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिल्याचे सामंत यांनी सांगितले. “ज्या टक्केवारीने समाज आम्हाला मतदान करतो, त्या पद्धतीने प्रत्येकाला न्याय देण्याचा आणि सोशल इंजिनिअरिंग १००% करण्याचा मी प्रयत्न केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपसोबत युती पक्की, पण जागावाटप गुलदस्त्यात!
शिवसेना आणि भाजप (BJP-Shivsena Alliance) युती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ५६ जागांपैकी भाजपला किती जागा मिळणार हे अंतिम यादीनंतरच कळेल, असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. “रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना माझ्याशी जुळवून घेण्यास सांगितले आहे, कारण ग्राउंड रिॲलिटी त्यांना माहित आहे. सध्या जिल्हा परिषदेत भाजपची एकही जागा नाही, त्यामुळे जे नवीन निवडून येतील ते ‘ऍड’ होणार आहेत,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
महानगरपालिका निकालांवर भाष्य: मनसेला टोला!
नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निकालांवर बोलताना सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारल्याचे सांगितले. “मुंबईसह राज्यभरात सव्वाशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेचे मोठे नुकसान झाले असून, त्यांची मते ‘युबीटी’ला (UBT) ट्रान्सफर झाली. ज्यांनी मराठीसाठी कष्ट घेतले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम युबीटीने केले,” असा घणाघात त्यांनी केला.
राष्ट्रवादीबाबत भूमिका
संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादीसोबत (NCP) महायुती म्हणून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर बोलताना, “मागच्या वेळी दोन जागा घेऊन त्यांनी १४ फॉर्म भरले होते आणि निकाल १४-० लागला. त्यामुळे आता आम्ही सावध आहोत,” असा टोला त्यांनी लगावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 17-01-2026














