रत्नागिरी : शहरातील गीताभवन येथे सुरु असलेल्या अभिषेक बुक सेंटरच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, चरित्र आत्मचरित्र, ऐतिहासिक व्यक्तीमत्व, आरोग्य, योगासने, पाककला, स्पर्धा परिक्षा, बाल साहित्य, शेती, कायदेविषयक, ज्योतिष, आध्यात्मिक अशा विविध विषयांवरील शेकडो पुस्तके सवलतीच्या दरात विक्री करता उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनात पुस्तकांच्या खरेदीवर दहा ते पन्नास टक्केपर्यत सूट आहे. या व्यतिरिक्त शाळा, वाचनालये, महाविद्यालये यांना पुस्तक खरेदीवर विशेष सवलत आहे. जगभरातील प्रसिद्ध लेखकांची मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषातील पुस्तके उपलब्ध आहेत. सकाळ प्रकाशनाची सर्वाधिक खपाची निवडक पुस्तके येथे ठेवण्यात आली असून त्यातील गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाला सर्वाधिक मागणी आहे, असे आयोजक अभयकुमार सिंग यांनी सांगितले. हे प्रदर्शन दररोज सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात खुले रहाणार असून रत्नागिरीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभयकुमार सिंग यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 28-10-2024














