पंचायत समितीसाठी उमेदवारांची ‘यादी’ जाहीर; जुन्या-नव्यांचा संगम साधत उदय सामंत यांचा मास्टरस्ट्रोक

रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे (Ratnagiri Panchayat Samiti Election 2026) बिगुल वाजले असून, शिवसेना उपनेते डॉ. उदय सामंत (Dr. Uday Samant) यांनी आज रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये सोशल इंजिनिअरिंग आणि विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

जाहीर झालेली गणनिहाय उमेदवार यादी खालीलप्रमाणे:

  • नाणीज: डॉ. पद्मजा संजय कांबळे
  • हातखंबा: विद्या विलास बोंबले
  • खेडशी: वैभव विठोबा पाटील
  • केळ्ये: सुमेश सुरेश आंबेकर
  • पावस: नामदेव नारायण कोकरे
  • गावखडी: स्वाती संदेश शिंदे
  • कळझोंडी: अनुष्का अभय खेडेकर
  • देऊड: नेहा प्रवीण गावणकर
  • करबुडे: प्रवीण धोंडू पांचाळ
  • नेवरे: पूर्वा सचिन दुर्गावळी
  • कोतवडे: स्वप्नील सदानंद मयेकर
  • साखरतर: परेश रामकृष्ण सावंत
  • झाडगाव: साक्षी परेश कुमठेकर
  • नाचणे: सचिन सुधाकर सुपल
  • कर्ला: कांचन कृष्णकांत नागवेकर
  • फणसोप: अर्चना तुषार साळवी
  • कसबा (संगमेश्वर): सुरेश सखाराम माईण
  • परचुरी: पूनम महेश देसाई
  • माभळे: सुहास सोमा मांगडे.

या यादीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचाराला आता खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.