चिपळूण : महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादीत अंतर्गत राज्यस्तरीय आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेला आजपासून (दि. १९) चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शुभारंभ होत आहे. दि. १९ ते २३ जानेवारी या कालावधीत दोन सत्रांमध्ये दहा नाटकांचे आयोजन होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वा. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे संचालक विश्वास पाठक, संचालक संजय मारूडकर, संचालक (प्रकल्प इंधन) अभय हर्णे, संचालक (वित्त) मनेश वाघीरकर, तर विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक आणि (कोळसा) पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (सं. व. सु. २ प्रकल्प) राजेश पाटील, कार्यकारी संचालक (मासं/पर्या. व सुरक्षितता) सौर नवीकरणीय (प्रकल्प) नितीन वाघ, कार्यकारी संचालक (माहिती तंत्रज्ञान) नितीन चादुरकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारूजकर आदी बक्षीस वितरण समारंभासही उपस्थित राहाणार आहेत.
या राज्यस्तरीय महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र स्पर्धेत राज्यातील कोयना जलविद्युत केंद्र पोफळी, औ. वि. केंद्र, पारस, महा. औ. केंद्र चंद्रपूर, औ. वि. केंद्र भुसावळ आदी संघ सहभागी होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 19/Jan/2026














