Ratnagiri : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोड, पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार १७ जानेवारी रोजी दुपारी १.३० वा. सुमारास करण्यात आली. साहिल अब्बास कागवाड (रा. आशियाना अपार्टमेंट मारुती मंदिर, रत्नागिरी) आणि रशिदमियाँ मणचेकर (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 19/Jan/2026