Ratnagiri : बेशुद्धावस्थेत आढळलेल्या वृद्धेचा उपचारावेळी मृत्यू

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरातील मच्छिमार्केट जवळी आजगावकर कंपाउंड येथे बेशुद्ध स्थितीत सापडलेल्या वृद्धेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयातील मृत्यू झाला. सुलभा सूर्यकांत पडवळ (६०, रा. आजगावर कंपाऊंड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

शनिवार १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास मच्छीमार्केटजवळील आजगावरक कंपाउंड येथे सुलभा पडवळ या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मिळून आल्या. तेथील महिलांनी त्यांना रिक्षेतून उपचारांसाठी जिल्हा शासय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना शुक्रवार १६ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वा. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 19/Jan/2026