रत्नागिरी-केळशी-पाजपंढरी बससेवा सुरू करण्याचे निर्देश

दापोली : रत्नागिरी-दापोली-केळशी ही बस कित्येक महिने बायपासमार्गे चालवली जाणारी एसटी बससेवा आता हर्णे व पाजपंढरीमार्गे चालवल्याने एसटी प्रवासी वर्गाचा त्रास कमी होणार आहे. रत्नागिरी-दापोली-केळशी ही बस गेली कित्येक महिने बायपास मार्गे चालवली जात होती. हर्णे व पाजपंढरी प्रवासी वर्गानी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थेचे रेल्वे अभ्यासक वैभव बहुतूले यांच्याकडे तक्रारीवरून प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक वाहतूक नितीन मैंद, उप महाव्यवस्थापक कोकण विभागाच्या माजी आर एम यामिनी जोशी नवनियुक्त आर. एम. चेतना किरवाडकर यांच्याकडे सततच्या पाठपुराव्याने १ जानेवारी २६ पासून हर्णे व पाजपंढरी मार्गे पूर्ववत करण्याचे निर्देश तसेच हर्णे व पाजपंढरी संगणकीय आरक्षण बंद करण्यात आरक्षण सुरू करण्याचे आदेश विभागीय नियंत्रक रत्नागिरी प्रज्ञेष बोरसे, विभागीय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी प्रमोद यादव व आगार व्यवस्थापक पाटील यांना देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी- दापोली-पाजपंढरी-केळशी संगणकीय आरक्षण करून प्रवास करावा जेणेकरून प्रवासी संख्येत वाढ होऊन एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 19/Jan/2026