Chiplun: पन्हाळजे मालवाडी येथे २९ रोजी राधाकृष्ण जया एकादशी महोत्सव

चिपळूण : राधाकृष्ण मंडळ मालवाडी पन्हाळजे खेड यांच्या वतीने दिनांक २९ ते ३० दरम्यान राधाकृष्ण जया एकादशी महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

या कार्यक्रमात दिनांक २९ रोजी सकाळी ७ वाजता महा अभिषेक व महापूजा, सकाळी ७.३० वाजता कलश पूजन, सकाळी ८ वाजता वीणा पूजन, सकाळी ९ वाजता वाडीतून राधाकृष्ण पालखीची भव्य मिरवणूक, सकाळी १०.३० वाजता ह भ प दीपक साळवी यांचे श्री गणराज ज्ञानेश्वरी समूह पारायण, दुपारी १.३०वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ४.३०वाजता ह भ प दीपक साळवी यांचे प्रवचन, सायंकाळी ६ वाजता मालवाडी राधाकृष्ण मंडळ व ग्रामस्थ वारकरी यांचा हरिपाठ, रात्री ७ ते ९ वाजता ह भ प राजेश जाधव तळे खेड यांचे कीर्तन, रात्री ९ . १५ ते १०.१५ वाजता निमंत्रित दिंडी कार्यक्रम व सत्कार सोहळा, रात्री १०.३० वाजता आई माऊली नाट्य नमन मंडळ कोंढे चिपळूण यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होईल.

त्यानंतर दिनांक ३० रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८.३० ते ९ पारायण, सकाळी १० ते १२ वाजता हभप दीपक साळवी यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १२ ते १ महादिंडी आणि त्यानंतर या भव्य कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राधाकृष्ण मंडळ मालवाडी पन्हाळजे व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 19-01-2026