Guhagar : अंजनवेल येथे चूल पेटवताना कपड्यांनी पेट घेतल्याने महिला भाजली

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे चूल पेटवल्यानंतर अंगावरील गाऊनने पेट घेतल्यामुळे भाजून जखमी झालेल्या महिलेला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ६ वा. सुमारास घडली. रजनी रघुनाथ संगमेश्कर (४५, रा. अंजनवेल, गुहागर) असे भाजून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला तातडीने प्रथम गुहागर ग्रामीण रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 19/Jan/2026