गुहागरात दुसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल

गुहागर : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एक अपक्ष उमेदवार अर्ज दाखल झाला आहे.

गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातील पडवे पंचायत समिती गणामधून आनंद भोजने यांनी पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी परिक्षित पाटील यांच्याकडे दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 19-01-2026