रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेमध्ये आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सुमारे ४० वर्षे शाळेमध्ये वरील उपक्रम सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन नाट्यकर्मी पल्लवी गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने शाळेच्या माजी मुख्याध्यापिका विजया टिकेकर पुरस्कृत या नाट्यछटा स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या जातात. या स्पर्धांना संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, प्राचार्य सुशील शिवलकर, प्रा. ज्ञानेश जोशी, माजी शिक्षिका सविता बर्वे या मान्यवरांनी पारितोषिके दिली आहेत. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विनोद नारकर, परीक्षक पल्लवी गोडसे, नेहा जोशी, ऋचा मुकादम, चैत्राली लिमये उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील अभिनय क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन शाळेमध्ये केले जात आहे. यातूनच अनेक विद्यार्थी संगीत, नाट्य, अभिनय क्षेत्रामध्ये उज्ज्वल कामगिरी करत आहेत.
स्पर्धेचा अंतिम निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने) पहिली अमोघ जोशी, सुव्रत सहस्रबुद्धे, पर्णवी मोरे, इ. दुसरी- ध्रुव थेराडे, स्मार्था भोरे, गौरांगी नितोरे. इ. तिसरी- रियांश साखरपेकर, ओवी पाटील, अवनी पेटकर. इ. चौथी- नचिकेत बाळ, प्रार्थना बोरकर, लावण्या मायंगडे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 19-01-2026














