Ladki Bahin Yojana E-KYC: वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.
ई-केवायसी करूनही लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे संतप्त महिला आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.
सर्वच लाडक्या बहिणी ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा, असा संताप यावेळी महिलांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात; मात्र या योजनेचा लाभ मिळत राहण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी (eKYC) करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे गैरव्यवहार टाळता येतील आणि केवळ गरजू महिलांनाच याचा फायदा मिळेल, ज्यासाठी आधार (Aadhaar) आधारित प्रक्रिया वापरली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 19-01-2026













