रत्नागिरी : तालुक्यातील महिलेचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विनोद भिकू मुदगल (३८, रा. आसावे, कुणबीवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे गळा आवळून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १४ मे २०२२ सकाळी ८.३० वा. सुमारास आसावे येथे घडली होती. फिर्यादी महिलेचे पती नेहमी प्रमाणे विठ्ठल मंदिर माखजन येथे पूजा करण्यासाठी गेले असताना महिला ही घरात एकटीच होती. त्यावेळी नेहमी काजू बागेत कामासाठी येणारा व सहा महिन्यापूर्वी त्याची आई बरोबर वाद झालेला आरोपी विनोद मुदगल तेथे आला. त्याने महिलेचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तपासात पोलिसांनी संशयितास अटक केली आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सोमवार १९ जानेवारी रोजी या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात लागला. जिल्हा सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर यांनी या खटल्यात १२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 20/Jan/2026














