रामपूर : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने शिक्षण संस्था आयोजित देवी पद्मावती विद्या संकुलात रविवारी रोजी झालेल्या ‘प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी एक धाव देशासाठी’ या अंतर्गत ६व्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ उद्योजक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत सुमारे १ हजार ९०० स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी प्रशांत यादव यांनी भारत देशाच्या ‘खेलो इंडिया’ या प्रसिद्ध मूलमंत्राबाबत माहिती देत आज-काल भरकट चाललेल्या नवीन पिढीला घडवण्याचे काम मॅरेथॉनसारख्या स्पर्धा करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई, मार्गताम्हाने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष अजित साळवी, सर्व संचालक, मार्गताम्हाने खुर्द सरपंच दीपक चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, मुख्याध्यापक भाऊ लकेश्री, डॉ. मनोज रावराणे, मॅरेथॉन स्पर्धाप्रमुख डॉ. नामदेव डोंगरे, राकेश खांडेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत शिशु गटात मार्गताम्हाने सेमी इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळा मुलांमध्ये सात्विक चव्हाण, स्वराज कांबळे, शौर्य बारस्कर, मुलींमध्ये कावेरी भडवळकर, नक्षत्रा हरवाडे, स्वर्णा पवार, १० वर्षाखालील मुले गटात राज पवार, सुजित अश्मरे, आयुष पेजले. मुलींच्या गटात शर्वरी तावडे, निधी निवळकर, बोधिका जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
१४ वर्षांखालील मुले गटात अवधूत सुर्वे (शिवरत्न अॅकॅडमी, चिपळूण), रवी कश्यप (अनिकेत स्पोर्टस् अॅकॅडमी, चिपळूण), गणराज डिंगणकर (आदर्श विद्यालय), तर मुलींच्या गटामध्ये इच्छा राजभर (गोविंदराव निकम विद्यालय, डेरवण), मृणाली खेराडे (महादेवराव शिर्के माध्यमिक विद्यालय भोम), कस्तुरी बेलोंडे (माध्यमिक विद्यालय हेदवी), १८ वर्षांखालील मुले गटात पृथ्वी राजभर (गोविंदराव निकम विद्यालय सावर्डे), वीर मेटकर (चिंचघरी सती विद्यालय), रोहित राठोड (पाटपन्हाळे विद्यालय), तर मुलींच्या गटामध्ये हमेरा सय्यद (शिवरत्न अकॅडमी), भाविका शिंदे (युनायटेड हायस्कूल), प्रियांशी शितप (भोम विद्यालय) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
अठरा वर्षांवरील खुला गट मुलांमध्ये स्वराज जोशी (अनंतराव पवार विद्यालय), संदीप जोयसी (शिवरत्न अॅकॅडमी सावर्डे चिपळूण), ओमकार चांदिवडे (आनंदराव पवार विद्यालय), तर मुलींच्या गटामध्ये खुशी हासे (आनंदराव पवार विद्यालय सावर्डे), योगिनी साळवी (रिगल कॉलेज तळी), तृप्ती गायकर (अनिकेत स्पोर्ट्स अकॅडमी चिपळूण) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 20/Jan/2026














