जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी चिपळुणात चार उमेदवारी अर्ज दाखल

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी एकूण ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जि. प. व पं. स. च्या निवडणूक रणधुमाळीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून चिपळुणात सुरुवात झाली आहे.

सोमवार दि. १९ रोजी चार उमेदवारांनी विविध गणासाठी अर्ज दाखल केले. यामध्ये तीन महिला व पुरुषाचा समावेश असून स्वबळावर लढणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीकडून २ तर सेना-भाजप युतीमध्ये शिंदे शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना गटातून संदेश (बापू) आयरे, माजी सभापती धनश्री शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर उर्वरित दोन अर्ज राष्ट्रवादी गटातून दाखल करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 20/Jan/2026