Ratnagiri : ‘अपार आयडी’साठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : राज्यातील काही जिल्ह्यात अद्याप विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झालेले नसल्यामुळे शासनाकडून दि. ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून अपार आयडी तयार करण्यासाठी शाळांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अपार आयडी तयार करण्याचे काम ९२.७२ टक्के पूर्ण झाले आहे.

अपार आयडी प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण हा मोठा अडथळा ठरत आहे. आधार पडताळणी, नाव व जन्मतारीख न जुळणे तसेच पालकांची संमती न मिळणे या कारणामुळे अपार आयडी तयार करण्यात अडचणी येत आहेत. तरी जिल्ह्यातील बहुतांश शाळांना या अडचणीवर मात करीत ९२.७२ टक्के कामाची पूर्तता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २,०६,८७८ विद्यार्थ्यांपैकी १,९३,३७६ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून १३,५०२ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

अपार आयडीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत
विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी शासनाने दि. ३१ जानेवारीपर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

अपार नसल्यास काय होणार माहिती आहे का?
सर्व प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अपार आयडी बंधनकारक आहे. अपार आयडी नसेल तर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा अर्जच भरता येणार नाही. त्यामुळे अपार आयडी काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

सीईटीसाठी ‘अपार’ अनिवार्य
बारावीतील विद्यार्थ्यांना अपार आयडी काढणे बंधनकारक आहे. अपार आयडी नसेल तर सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षीचा अर्जच भरता येणार नाही.

अपार आयडी कसा काढायचा?
अपारच्या appr.education.gov.in या संकेतस्थळावर मोबाईल नंबर व पासवर्ड लॉग इन करून अपार आयडी काढता येतो.

अपार’ आयडी म्हणजे काय ?
अपार आयडी हा एक युनिक डिजिटल ओळख क्रमांक असून विद्यार्थ्यांची स्वयंचलित कायमस्वरूपी नोंदणी या माध्यमातून केली जात आहे. भविष्यात अपार आयडी गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:59 PM 20/Jan/2026