रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यात १६ उमेदवारांनी १९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
या अर्जांचा तपशील असा – दापोली – कदम योगेश रामदास – शिवसेना (प्रस्तावकामार्फत दाखल), खांबे ज्ञानदेव रामचंद्र – अपक्ष, खाडे सुनील पांडुरंग -अपक्ष, अबगुल संतोष सोनू – महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष असे २ अर्ज
गुहागर – फडकले संदीप हरी – अपक्ष, जाधव विक्रांत भास्कर -शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र – शिवसेना, गांधी प्रमोद सीताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष.
चिपळूण – शेखर गोविंदराव निकम – राष्ट्रवादी काँग्रेस, २ अर्ज, सुनील शांताराम खंडागळे – अपक्ष
रत्नागिरी – सुरेंद्रनाथ यशवंत माने – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
राजापूर – अमृत अनंत तांबडे -अपक्ष, अविनाश शांताराम लाड -अपक्ष, जाधव संदीप विश्राम – बहुजन समाज पार्टी, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २ अर्ज.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 29-10-2024














