राजापूर नगर परिषदेची विषय समिती निवडणूक बिनविरोध

राजापूर : राजापूर नगर परिषदेची विषय समिती सभापती व स्थायी समित सदस्य निवडणूक प्रक्रियेत सत्ताधारी महाविकास आघाडीकडून एक सभापतीपद विरोधी गटाला देण्यात आल्याने ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली. उपनगराध्यक्ष विनय गुरव हे शिक्षण व क्रिडा समितीचे पदसिध्द सभापती असणार असून बांधकाम समिती सभापतीपदी सुबोध पवार, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी सुलतान ठाकूर यांची निवड करण्यात आली. तर पाणीपुरवठा समिती सभापतीपद विरोधी गटाला देताना या समितीच्या सभापती पदी सौरभ खडपे यांची निवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शबाना मुल्ला यांची तर उपाध्यक्षपदी जान्हवी वादक यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीचे अध्यक्षपद हे नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्याकडे असणार असून सर्व समिती सभापती हे या स्थायी समितीचे सदस्य असणार आहेत. राजापूर नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व स्थायी समित सदस्य निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणूकीत सर्व समिती सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व स्थायी समिती गठीत करण्यात आली.

स्थायी समितीमध्ये अध्यक्षांसह अन्य पाच असे सहा सदस्य असावेत असा ठराव महाविकास आघाडीचे गटनेते एड. जमिर खलिफे यांनी मांडला. तर या समितीमध्ये अध्यक्षांसह अन्य सहा असे सात सदस्य असावेत अशी उपसूचना महायुतीचे गटनेते एड. राहुल तांबे यांनी मांडली. यावर सभागृहात मतदान झाले व एड. तांबे यांची उपसुचना ११ विरूध्द १० मतांनी फेटाळण्यात आली. ठरावाच्या बाजुने ११ तर उपसुचनेच्या बाजुने १० मते पडली.

बांधकाम समिती सभापती सुबोध पावर, सदस्य-एड. जमिर खलिफे, नेहा तानवडे, प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, सार्वजनिक आरोग्य रक्षण व स्वच्छता समिती सभापती सुलतान ठाकूर, सदस्य- नेहा तानवडे, सिध्दांत जाधव, दिलीप अमरे, सौरभ पेणकर, पाणीपुरवठा व जलनिसारण समिती सभापती सौरभ खडपे, सदस्य – एड. जमिर खलिफे, जान्हवी वादक, अफरोज झारी, दिलीप चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती शबाना मुल्ला, उपाध्यक्ष जान्हवी वादक, सदस्य अमिना गडकरी, उर्मिला बाकाळकर, सुयोगा जठार यांची निवड कण्यात आली आहे. तर उपनगराध्यक्ष विनय गुरव हे शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक समितीचे सभापती असणार असून या समितीच्या सदस्यपदी अफरोज झारी, सिध्दांत जाधव, एड. राहुल तांबे सान्वी रावण यांची निवड करण्यात आली.

तर नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती गठीत करण्यात आली असून या स्थायी समितीमध्ये सर्व समिती सभापती सदस्य म्हणून असणार आहेत. यामध्ये सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती विनय गुरव, बांधकाम सभापती सुबोध पवार, आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, महिला व बालकल्याण सभापती शबाना मुल्ला यांचा समावेश आहे. या नवनिर्वाचित सभापतींचे नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव, महाविकास आघाडीचे गटनेते एड. जमिर खलिफे, महायुतीचे गटनेते एड. राहुल तांबे यांसह सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले.

सत्ताधारी गटाकडून विरोधी गटाची मागणी मान्य झाल्याने बिनविरोध निवडणूक

राजापूर नगर परिषदेच्या सभागृहात महाविकास आघाडीचे बहुमत आहे. मात्र या निवडणूकीत विरोधी गटाकडून एका सभापती पदाची मागणी करण्यात आली. यावर सत्ताधारी गटानेही सहकार्याची भूमिका घेत पाणीपुरवठा समिती सभापतीपदासाठी निश्चित केलेला एड. जमिर खलिफे यांचा अर्ज न भरण्याचा निर्णय घेत हे सभापतीपद विरोधी गटाला देण्याचे निश्चित करण्यात आले. या पदासाठी महायुतीकडून सौरभ खडपे यांचे नाव देण्यात आले त्याला मान्यता देत सत्ताधारी गटाकडून पाणीपुरवठा समिती सभापती पद देतानाच विषय समितीतही विरोधी गटाच्या नगरसेवकांना स्थान देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 20/Jan/2026