दापोली : येथील नगरपंचायतीतर्फे २३ जानेवारी रोजी गुहागर समुद्रावर ब्ल्यू फ्लॅग मॅरेथॉन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शहरात प्रथमच आयोजित केलेली ही मॅरेथॉन स्पर्धा आगळीवेगळी ठरणार आहे.
गुहागर समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. ओहोटीची वेळ साधून समुद्राच्या वाळूमध्ये ही मॅरेथॉन दौड होणार आहे. ६ किलोमीटरचा स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील या मॅरेथॉनकरीता २ किलोमीटर, ४ कि.मी., ६ कि.मी. साठी सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. पुरुष व महिला अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून कमीत कमी वेळेमध्ये अंतर पार करणारा स्पर्धक विजेता ठरणार आहे, असे आवाहन गुहागर नगरपंचायतीने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 21/Jan/2026














