देवरुख : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज भरणा कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यात सोमवारी जिल्हा परिषदेसाठी एक व पंचायत समिती गणासाठी २ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद साडवली गटात रूपाली रूपेश कदम यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे.
पंचायत समिती निवे बुद्रुक गणात प्रफुल सोनू बाईत यांनी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साडवली पंचायत समिती गणासाठी तृप्ती सचिन मांगले यांनी शिंदे गट शिवसेनेकडून सोमवारी अर्ज दाखल केला आहे. संगमेश्वर तालुक्यात ७ जिल्हा परिषद गट असून १४ पंचायत समिती गणा साठी निवडणूक होत आहे. तालुक्यात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सोमवारीच तीन अर्ज दाखल झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 21/Jan/2026














