रत्नागिरीत उन्हाच्या झळा वाढल्या..

रत्नागिरी : पावसाळा संपल्यानंतर थंडी पडण्याचे दिवस असताना तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने किनारपट्टी भागात उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३० ते ३१ अंशांच्या वर गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. आठवडाभर उन्हाचा हा चटका कायम राहण्याची शक्यता असून, यामध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहेत. काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती कायम असताना उन्हाचा चटका वाढला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 29-10-2024