रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-जिल्हा रुग्णालयातील विविध रिक्त पदे असून पहिल्या टप्प्यातील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पद्धतीने भरण्यात येणार असून त्यासाठी जाहिरात ही प्रसिध्द झाली आहे. प्राध्यापक भरतीसाठी इच्छुकांना २७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदाबाबत एका वृत्तपत्राने वारंवार आवाज उठविला होता. अखेर वृत्तामुळे व पाठपुराव्याला यश आले यश आहे.
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयात २७१ पदे रिक्त असल्यामुळे इतर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर ताण पडत होता. ही पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरती होणार आहे. प्राध्यापक ३७, सहयोगी प्राध्यापक २२, सहायक प्राध्यापक ३५ इतकी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील भूमीपुत्रांना रत्नागिरीतच रोजगार मिळणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिध्द झालेली असून इच्छुक उमेदवारांनी २७जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
माहिती, अर्जासाठी याठिकाणी तपशील पहा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी संस्थेच्या अधिपत्याखालील प्राध्यापक, सहयोगी, सहायक प्राध्यापक पदाची रिक्त पदे कंत्राटीपध्दतीने भरण्यात येणार आहे. भरतीचा तपसशील www.gmcratnagiri.in या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.
ही पदे आहेत रिक्त
प्राध्यापक ३७
सहयोगी प्राध्यापक-२२
सहायक प्राध्यापक ३५
लिपिक वर्ग- ३७
तांत्रिक पदे- २९
एकूण १४०
एकूण रिक्त मेडिकल कॉलेज,
रुग्णालय मिळून २७१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यास मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यात कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक भरती होणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्यावी- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 21/Jan/2026














