रत्नागिरी : पीएम-उषा योजनेंतर्गत शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत औद्योगिक जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्साहात पार पडला. या अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांसाठी टी. जे. मरीन प्रॉडक्टस् प्रा. लि., रत्नागिरी येथे औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. या अभ्यासक्रमात ३० विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या अभ्यासक्रमात सौरभ शिंदे (वरिष्ठ सुपरवायझर, गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., रत्नागिरी), ओंकार केतकर (व्हेंट्री बायोलॉजिकल्स व्हॅक्सीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, पुणे), बॉस्को बोथेलो (सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे), सिद्धी राउळ (मोलबायो डायग्नोस्टिक्स प्रा. लि., गोवा) व प्रीती आंब्रे (टी. जे. मरीन प्रॉडक्टस् प्रा. लि., रत्नागिरी) या औद्योगिक क्षेत्रांतील तज्ज्ञ संसाधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत औद्योगिक जैवतंत्रज्ञानातील शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व, वाढत्या रोजगार संधी, फर्मेटरची रचना व कार्यपद्धती, आम्ले, अल्कोहोल व प्रतिजैविके यांसारखी किण्वन उत्पादने, व संकल्पना, किण्वन उत्पादनांचे डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग व निर्मिती, औद्योगिक जैवतंत्रज्ञानाशी संबंधित कायदे व नियमावली आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक डॉ. यास्मीन आवटे, संयोजिका प्रा. रश्मी भावे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. समिधा शिंदे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 21/Jan/2026














