राजापूर नगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अॅड. हुस्नबानू खलिफे

राजापूर : राजापूर नगरपालिकेच्या आज झालेल्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्य निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिक्षण व क्रीडा समिती, बांधकाम समिती, आरोग्य व स्वच्छता समिती आणि महिला व बालकल्याण अशा चार समित्यांचे सभापतिपद तर, पाणी समिती विरोधी गट असलेल्या महायुतीकडे राहिली आहे, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष अॅड. हुस्नबानू खलिफे या असणार असून, सर्व समिती सभापती हे स्थायी समिती सदस्य राहणार आहेत.

उपनगराध्यक्ष विनय गुरव हे शिक्षण व क्रीडा समितीचे पदसिद्ध सभापती असणार असून बांधकाम समिती सभापतिपदी सुबोध पवार, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी सुलतान ठाकूर, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सौरभ खडपे आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शबाना मुल्ला आणि उपसभापतीपदी जान्हवी वादक यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद नगराध्यक्ष अॅड. हुस्नबानू खलिफे असणार असून सर्व समिती सभापती हे स्थायी समिती सदस्य राहणार आहेत.

राजापूर नगरपालिकेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्य पदाची निवडणूक झाली. मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये स्थायी समितीमध्ये अध्यक्षांसह अन्य पाच असे सहा सदस्य असावेत, असा ठराव महाविकास आघाडीचे गटनेते अॅड. जमीर खलिफे यांनी मांडला, तर स्थायी समितीमध्ये अध्यक्षांसह सहा असे सात सदस्य असावेत अशी उपसूचना महायुतीचे गटनेते अॅड. राहुल तांबे यांनी मांडली. सभागृहामध्ये झालेल्या मतदानामध्ये अॅड. तांबे यांची उपसूचना अकरा विरूद्ध १० मतांनी फेटाळण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 22/Jan/2026